सावकारकीच्या पैशाच्या कारणाने एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून केली आत्महत्या
BY
- युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मोहोळ
तीन लाखाचे झाले 15 लाख या सावकार की च्या पैशाच्या कारणाने एका
शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या
केली.हि घटना शनिवार दि. ०९ मार्च रोजी पहाटे
आष्टी ता. मोहोळ येथे घडली. महादेव
गजेंद्र सुर्वे वय५५ (रा.आष्टी ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या आत्महत्याची फिर्याद मयताचा मुलगा गणेश याने
मोहोळ पोलीसात दिली आहे.याबाबत मोहोळ पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
महादेव गजेंद्र सुर्वे (रा. खुनेश्वर ता. मोहोळ)
यां शेतकऱ्याने खाजगी बेकायदा सावकारकीचा व्यवसाय
करणारे सावकार उमेश उत्रेश्वर सुर्वे, शिवाजी
नामदेव सुर्वे याचे कडून २०११ साली मुलीच्या लग्नासाठी ३% व्याजाने तीन लाख रुपये घेतले
होते. २०१४ साली दोन एकर जमीन विकूण ४ लाख परत दिले होते. परंतु सावकार उमेश उत्रेश्वर
सुर्वे, शिवाजी नामदेव सुर्वे ( रा.बैरागवाडी, ता. माढा) तुझ्या फक्त १८ लाख व्याजासह
झाले आहेत व्याज न दिल्याने ती रक्कम मुदलात, मिसळावी लागते त्यामुळे तुझ्या कडची रक्कम
वाढत चालली आहे तु लवकर पैसे दे अथवा मळ्यात मी नांगर फिरवीन, ज्वारीचे पिक कडब्यासह
घेवुन जाईल अशी धमकी दिली त्यामुळे तिन लाख घेऊन साडेचार लाख फेडले तरी पंधरा लाख मागत
आहे आता ऐवढे पैसे कोठून दया वयाचे आता सावकार जमीन घेऊन आपल्याला बेघर करणार कुटूंबासह
आता कोठे जावयाचे म्हणुन निराश होवुन त्याने अत्महत्या केली अशी चिठ्ठी खिशात सापडली
असल्याची माहिती पोलीसांनी दिली. शुक्रवार दि ०९ मार्च रोजी पहाटे शेतातील लिंबाच्या झाडास दोरीच्या साह्याने
गळफास घेवून आत्महत्या केली. हि घटना उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची
माहिती मिळताच मोहोळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळाचा
पंचनामा करुन त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून
दिले. या प्रकरणी गणेश महादेव सुर्वे या मयताच्या मुलाने पोलीसात खबर दिली असुन सावकार उमेश उत्रेश्वर सुर्वे, शिवाजी नामदेव सुर्वे या दोघा च्या विराधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील उपपोलीस
निरीक्षक सोनकांबळे व पो.काँ. संजय जाधव हे करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आष्टी परिसरात
हळहळ व्यक्त केली जात आहे.



No comments