web-banner-lshep2024

Breaking News

तहसिलदार सचिन चौधर यांनी जाता जाता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आशिर्वाद वर्षावला ; कृषी उत्पन्न बाजार समिती चौकशी तहसिलदार सचिन चौधर यांनी दाबली

BY -  कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील मोठया प्रमाणात घोटाळा तसेच अनधिकृत बांधकामे केले असल्याची तक्रार अर्जदारानी केली असता मंत्रालय,ठाणे जिल्हाधिकारी,मुरबाड तहसिलदार यांचेकडे करण्यात आली होती.याच कृषी उत्पन्न बाजार समितीने अनधिकृत व गैरव्यवहार प्रकार केला असल्याचे विधानसभेत एल.ए.क्यू ही करण्यात आले.त्यावेळी कृषी उत्तन्न बाजार समिती यांची चौकशी वरिष्ठ अधिकारी यांनी लावली असता मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांच्या कालावधीत चौकशी आली होती.तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा खोटा अहवाल जशास तसा शासनाला सादर करून कृषी उत्पन्न बाजार समितीला वाचविण्याचा महाप्रताप तहसिलदार सचिन चौधर यांनी केला आहे.
     मुरबाड शहरातील महसुल क्र.152 (अ) या सर्व्हे नंबरची जमीन महसुल खात्याची असुन त्या जमिनीवर आजी माजी चेअरमन,संचालक,तसेच प्रभारी सचिव मोरे यांनी व्यापार्‍यांकडून 7 लाख,6 लाख,5 लाख रूपये घेऊन बेकायदेशीर गाल्यांची विक्री केली आहे.2012 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तक्रार दाराच्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली होती तेव्हा शासनाने शासनाच्या नियम अटी तटीचा भंग केले असल्याने शर्तभंगही करण्यात आली होती.त्यामध्ये महसुल भुखंड 152(अ) ची 4 एकर 27 गुंठे जागा असताना 1,2,3 टप्प्याचे बांधकाम करण्यात आले यामध्ये तिसर्‍या टप्प्याच्या 72 गाळयांची बांधकामे अनधिकृत असल्याने मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांना लेखी स्वरूपात तक्रारदार यांनी जबाबात मांडून निदर्शनास आणूनही दिले.तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोरे यांनी सचिन चौधर यांच्याशी संगणमत करून सदरची चौकशी दाबविण्यात आली.अनधिकृत बांधकामे बांधून अवैधरित्या गाळयांची 5,6,7 लाखात विक्री केली असून अनधिकृत गाळयांना सील करण्याची मागणीही करण्यात आली होती परंतू शासनाला नंतर कोणत्याही प्रकारचा तक्रारदाराचा अहवाल,लेखी खुलासा सादर केला गेला नाही.यामध्ये आपला आशिर्वाद तहसिलदार सचिन चौधर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जाता जाता देऊन गेले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला असून महसुल भुखंड हडप करणार्‍याला प्रशासकच जर पाठिशी घालत असेल तर हा तर एकच विषय आहे बाकीचा तालुक्यातील तर विविध असे विषय असतील की,ज्यात तहसिलदार सचिन चौधर यांनी आपला आशिर्वाद दिला आहे.शासनाच्या नियमांना धाब्यावर मारून तक्रारदाराच्या अर्जावर सेटलमेंट मुरबाडमध्ये केला जातो हा काय जुना विषय नाही.येथे अधिकारी आला की तो स्वतःची पोळी पहिले भाजतो नंतर जनतेची सेवा हे जाता जाता सचिन चौधर यांनी दाखवून दिला आहे.
    कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन,संचालक,सचिव मोरे यांनी शासनाची दिशाभुल केली असून त्यांच्याच घरातील माणसांचे नावे गाळयाची विक्री शासकीय दरात करून घेतली आहे.इतरत्र विक्री मनासारखे भरमसाठ दर लावून अनधिकृत गाळयाची विक्री केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवार्इ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून त्याची फेर चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

No comments