गोरखगडावर सह्याद्री प्रतिष्ठानने लावला सागवानी लाकडी प्रवेशद्वार
BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे.संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे आणि कार्याध्यक्ष आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली दुर्ग संवर्धन चळवळ महाराष्ट्रभर सुरू आहे.आजवर ७५० हुन अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा या महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील किल्ल्यांवर राबविण्यात आले आहे. दि १४ ऑक्टोबर रोजी अवघड अश्या किल्याचा कातळ रोहन करून ४०० किलो वजनी दरवाजावर सह्याद्रीच्या मुरबाड विभागाने अथक परिश्रम करून वर नेण्यात आले यासाठी प्रसिद्ध गिरीरोहक श्री संजय लोकरे आणि श्री गणेश गिध यांनी मोलाचे सहकार्य केले.खरं तर सह्याद्री प्रतिष्ठानने गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यातील तुंग किल्यावर सागवानी लाकडी कवाड लावले होते त्यानंतर पुण्यातील तिकोना किल्यावर ही दरवाजा लावला आहे आणि हा तिसरा दरवाजा दि.१८ ऑक्टोबर २०१८ रोजी दसरा सीमोल्लंघन निम्मित ठाणे जिल्ह्यातील गोरखगडावर लावण्यात आला.हा प्रवेशद्वार श्री संभाजी हरड ( मासले बेलपाडा ) यांनी बनवला असुन हा दरवाजा त्यांनी एक महीन्यात तयार केला.केला.हा प्रवेशद्वार लोकवर्गणीतुन तयार करण्यात आला.
कारक्रमाची रूपरेषा - तसेच या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वाजता खोपिवली गावातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालाखी सोहळ्याने झाली.गावकऱ्यानी प्रचंड मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभाग त्याबद्दल खोपिवली ग्रामस्थ यांचे आभार. तेथून साधारण ४५०
शिवप्रेमीनी गडावर प्रस्थान केले.गडावरील उंच खडकात नव्याने बसविलेल्या दरवाजाचे लोकार्पण प्रमुख पाहुणे श्री.सत्यशिलराजे दाभाडे सरकार, श्री राहुल मारणे(शिवरायांची वेशभूषा) तसेच संस्थेचे संस्थापक प्रा. श्रमिक गोजमगुंडे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण झाले.भंडारा उधळून शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियोजन संस्थेने घेतली होती.पुढे गडाच्या माचीवर असलेले आई डेरमाता मंदिरात कार्यक्रमाला सुरवात झाली प्रमुख उपस्थिती श्री.सत्यशिलराजे दाभाडे सरकार,अॕड.श्री.रविंद्र यादव,श्री.M
W बडवाईक ( वनपरिक्षेत्र आधिकारी भिमा.अभयारण्य क्र २
),शिवसह्याद्री नाट्य टिम,संकल्प ग्राफीक्स( प्रकाश व्यापारी ) ( नाटकाचे प्रमोश मुरबाड विभागाच्या हस्ते झाले)ॲड.श्री रविंद्र यादव सर यांनी शिवकालीन इतिहास यावर व्याख्यान केले.प्रा.श्री श्रमिक गोजमगुंडे सर यांनी दुर्ग संवर्धन या विषयावर व्याख्यान दिले तसेच संस्थेच्या पुढिल कार्याची माहीती दिली.सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड विभागाचे आंजिक्य हरड,नरेश विशे,राम भांडे,महेश गोल्हे,प्रताप गोडांबे,धनाजी वाघ,गिरिश केदार,दर्शन फुलसुंदे,भावेश देसले,विकी विशे,प्रभाकर जाधव,योगेंद्र वारघडे,कल्पेश पवार,तसेच ग्रामस्थ मंडळ खोपिवली व ग्रामस्थ मंडळ देहरी यांनी विशेष सहकार्य केले..,तसेच या प्रवेशद्वारासाठी सर्व मदत करांचे आभार प्रतिष्ठानकडुन करण्यात आले.


No comments