web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या त्या मंडळाने दिला स्त्री पुरूष एकतेचा संदेश...!

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
सध्या महाराष्ट्रासह देशात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.बाप्पाचे मकर सजावट यावेळी मंडप कपडा टाकावु वस्तु व पेपर पोस्टर या पध्दतीचे मकर बनवण्यात आले आहे.कोणी समस्याची तर कोणी भ्रष्टाचाराचा देखावा दाखवुन सरकारला जागे करण्याचे काम या मकर डेकोरेशनच्या माध्यमातुन केले गेले आहे.
असाच एक आगळावेगळा संदेश मकर डेकोरेशनच्या माध्यमातुन मुरबाड शहरातील जोगेश्‍वरी वाणीआळी मित्र मंडळ येथील मित्रमंडळानी केले आहे.स्त्री पुरूष मधील भदेभाव दुरू करून स्त्री ही एक सक्षम नारी आहे.तीही या समाजकार्याची एक हिस्सा आहे.
त्यामध्ये भेदभाव करून नये स्त्रीला समान सन्मान मिळावा.देशात महाराष्ट्रात स्त्रीवर होणारे हल्ले अत्याचार यावर सरकारने कडक कायदे बनवावे.जणेकरून आमच्या महाराजांच्या देशात महाराष्ट्रात स्त्रीवर कोणी अन्याय अत्याचार करणार नाही.स्त्रीला एक समान अधिकार मिळावा असा आगळावेगळा संदेश जोगेश्‍वरी वाणीआळी मित्र मंडळाकडुन दिला जात असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

No comments