मुरबाड नगरपंचायतीच्या मुजोर पंकज भुसेला तात्काळ निलंबीत करा
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
मुरबाड नगरपंचायतीचे विविध कारस्थाने संपुर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे.कुचकामी ठरलेली आणि मनाप्रमाणे वागणारी मुरबाड नगरपंचायत प्रशासनाच्या नावाखाली वेडीवाकडी भुमिका साकारत आहे.जेथे दिसेल तिथे आपली जागा आणि आलेल्या नागरिकांच्या तक्रारींना सेटलमेंट करून पैसे कामवणार्या नगरपंचायत अधिकारी,कर्मचार्यांनी सर्वांना धाबेवर मारून शासकीय आदेशाला केराची टोपली देऊन पायदळी तुडवली जाते.प्रशासन व्यवस्था धिंदवडे उडवणार्या मुरबाड नगरपंचयातीला बरखास्त करण्याची मागणी कित्येक वेळा केली गेली बोगसपणा शासनासमोर आले परंतू लोकप्रतिनिधींनी व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांनी कारवार्इकडे दुर्लक्ष करत पाठिंबा देऊन मुरबाड नगरपंचायत जगवली आहे.पी.डब्ल्यू च्या अशा जागेत नगरपंचायत टेंडर काढते,की त्याच कामावर पी.डब्ल्यू चा पहिलेच टेंडर पडलेला आहे.ती जागा नक्की कोनाच्या जागेत येते हे अद्दयाप सिध्द झाले नाही.म्हणजे पोरगा आहे फक्त बापाचा शोध लावणे बाकी आहे.मुरबाड नगरपंचायतीच्या नावाखाली एम.पी.एस.सी चालू करण्यात आले असल्याची बॅनेरबाजी करण्यात आली होती परंतू सरकारची हवा जोमाने वाहू लागल्याने अफवांच्या लाटा मुरबाडला आल्या आणि काया पालट झाली.एम.पी.एस.सी कार्यालय या लाटेत आजही बंद आहे.फक्त उदघाटने करण्यात आली परंतू चालू करण्याकडे मुरबाड नगरपंचायतीने आळसपणा दाखवला आहे.कित्येक अनधिकृत र्इमारती मुरबाड,सोसायटी यांच्या तक्रारी आल्या परंतू सेटलमेंट करणारी मुरबाड नगरपंचायत व येथिल अधिकारी,कर्मचारी यांनी बोलबच्चनीपनाने नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत अनधिकृत शब्दाची जोपासना केली आहे.कित्येक तक्रारी अर्ज असतील त्यांना निकाली काढण्यात अपयशी ठरलेली मुरबाड नगरपंचायत व मुख्याधिकारी पंकज भुसे अनधिकृतेला खंबीर पाठिंबा देत असून लोकप्रतिनिधीं यांना पाठिंबा देत आहेत.
मुरबाड नगरपंचयतीचे सिओ पंकज भुसे यांनी शहापूर येथे प्रभारी चार्ज घेऊन तेथील काही अनधिकृत इमारतींना पैसे खाऊन परवानग्या दिल्या.त्या पंकज भुसे विरोधात तेथीलच भाजपा कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री,नगररचनाकार मंत्री,नगररचनाकार मंत्रालय,ठाणे यांच्याकडे तक्रार केली परंतू त्यांच्याही तक्रारीला पारदर्शक मुख्यमंत्री महोदयांनी दखल न घेता पंकज भुसे याला पाठिंबा दिला.कित्येक तक्रारी होतात परंतू एका अधिकार्यावरही कारवार्इ केली जात नाही.अशांच्या पाठिशी सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी खंबीर उभे असून न्यायव्यवस्था विकली गेल्याचे दिसून येत आहे.सर्वसामान्यांवर तात्काळ कारवार्इ परंतू पंकज भुसे सारख्या मुजोर,मनमानी अधिकार्याविरोधात कारवार्इ शुन्यच असते.मुख्यमंत्री कारवार्इचे आदेश आज सोडतील,उद्दया सोडतील परंतू आदेश काय होत नाही. लोकप्रतिनिधींनाही पंकज भुसे अधिकार्याचं पारड जड जाऊ लागल्याने अनधिकृत बांधकामाचा पाठिराखा पंकज भुसे याची तात्काळ बदली व्हावी अशी भुमिका जरी सर्व नागरिकांमते परखड असली तरी सेटलमेंटच्या जोरावर मोर कायमच आहे.कित्येक नागरिकांना अवाच्य भाष्य करत आरे तुरे भाषा वापरणार्या पंकज भुसेला कारवार्इ करून निलंबीत करण्याची मागणी करत उपोषणे केली जातात परंतू आपल्या प्रशानाला त्यांचा अधिकारी महत्वाचा वाटतो जो अनधिकृतेचा पाठिराखा आहे.एखाद्दया नागरिकानी आरे तुरे भाष्य वापरले तर तेव्हा शासन जागे होऊन कारवार्इ करते परंतू त्याच अधिकार्यानी आरे तुरेची भाषा वापरली तर त्याच्यावर कारवार्इ साठी गेलेला सर्वसामान्य नागरिकाची तक्रार पायदळी तुडवली जाते.मुरबाड नगरपंचायत अस्थित्वात आली तेव्हा कित्ये प्रभारी अधिकारी होऊन गेले तेव्हा कधी अनधिकृत शब्द आला नव्हता परंतू पंकज भुसे याने मुख्याधिकारी पदभार स्विकारताच अनधिकृत गाले,शहापूरमध्ये अनधिकृत इमारतींना परवानग्या,असे कित्येक ठिकाणी अनधिकृत हा शब्द आलाच.मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या अनधिकृतमध्ये लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने या माघे तर लोकप्रतिनिधी गुंतले नाही ना ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.अभय दिलेल्या पंकज भुसे याच्या विरोधात विविध तक्रारी दाखल झाल्या परंतू एकाही तक्रारी उत्तर न देता मनाप्रमाणे राजासारखा वागणारा पंकज भुसे शासनाच्या नियम अटी,आदेश,कारवार्इला पायदळी तुडवली आहे.अशा मुजोर पंकज भुसेला तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार श्री.नामदेव शेलार यांनी थेट पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.


No comments