भात लावण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना वाचविण्यात स्थानिकांना यश
BY, प्रसाद अटक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - खालापूर
संपूर्ण रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले.खालापूर तालुक्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी पहायला मिळत होते. पेण खोपोली रस्त्यावरुन जवळपास दहा ते बारा ठिकाणावरुन पाणी जोराने वाहत होते त्यामुळे काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता.यातच वावोशी फाटा येथील इंदूबाई गैरु पाटील वय ६५ वर्षे ह्या आपल्या शेतावर ,मंदा वाघमारे,बेबी जाधव या दोन आदिवासी महिलांसह भातलागवडीसाठी रोप काढण्याचे काम करण्यासाठी गेल्या होत्या.शेताजवळून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य नव्हते.त्या शेताच्या उंच बांदावर अडकून पडल्या होत्या.बघता बघता पाणी वाढू लागले व त्या संकटात सापडल्या ही माहिती पत्रकार हनुमंत मोरे यांंनी तात्काळ खालापूर चे तहसीलदार व पोलीस यांना दिली.सदर महिलांना बाहेर काढण्यासाठी शंकर दादा मानकावळे,संदेश पाटील तर वावोशी पोलीस दुरक्षेत्र मधील पोलीस कर्मचारी जनार्धन म्हात्रे यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्यांनी सुखरूप बाहेर काढले.


No comments