web-banner-lshep2024

Breaking News

जिल्ह्यातील सर्वच भागात रात्रीपासून धो-धो पाऊस ....

BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - कल्याण
कल्याण - नगर राष्ट्रीय  मार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी वेगाने वाहत आहे. एवढेच नाही, तर मुरबाड किशोर गावाजवळ पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे नगर जिल्ह्यातून येणारा भाजीपाला, दूध  यांच्या ट्रक, टेंपो, टँकर अडकून पडले आहेत. शहापूर शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहापूरमध्ये ठिकठिकाणी असलेल्या मोठ्या नाल्याची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  भिवंडी ग्रामीण भागातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातही 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय तीन बत्ती परिसरातील भाजी मार्केटसह बाजार पेठेतही बहुतांशी दुकानांत पाणी शिरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. 

No comments