सामर्थ्य जनशक्ती च्या उषाताई मुंढे यांचे वतीने समितीला निवेदन करणार सादर
BY, प्रसाद अटक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह – खालापूर,रायगड
महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समिती यांचे वतीने मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग वर उद्या दोन दिवसीय पाहणी दौरा करण्यात येणार असल्याने सामर्थ्य जनशक्ती यांचे वतीने उषाताई मुंढे सामर्थ्य जनशक्ती प्रदेश उपाध्यक्षा व इतर मंडळी यांचे वतीने विविध भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन देणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्षा उषाताई मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या मध्ये प्रामुख्याने मुबंई पुणे एक्सप्रेस वे होऊन १५ वर्ष उलटुन गेली विकासाचा मार्ग मोकळा झाला परंतु दुसरीकडे प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची काळजी मात्र घेण्याकडे दिवसेदिवस दुर्लक्ष होत आहे.रोजच अपघात घडतात व त्याचही बाजारीकरण चालु आहे.प्रवाश्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या गेल्या परंतु सरक्षा या विषयाचा msrdc च्या अधिका-यांना विसर पडला. तसेच विविध सोयी सुविधा देण्याच्या नावाखाली, भुखंड घोटाळा, टेडंर घोटाळा, ट्रक टर्मिनल घोटाळा अश्या योजनाच्या नावाखाली msrdc ( रस्ते विकास महामंडळ ) वर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.तरी संबंधित ह्या समितीने या संदर्भात योग्यती दखल घ्यावी या करिता निवेदन सादर करण्यात येणार आहे.



No comments