भादाणे-आतकोली,तळवली,अर्जुली गावठण जमीनीवरील अनधिकृत अतिक्रमणे करणार्यावर कारवार्इ करण्याची नागरिकांची मागणी
BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - पडघा -
भिवंडी तहसिलदार कार्यालयाच्या अंतर्गत भादाणे आतकोली व तळवली,अर्जुली गावाशेजारी अनेकांनी शासकीय जमीनीवर (गुलचरण जमीन) मोठया प्रमाणात अतिक्रमण करून तेथे बांधकामे केली आहेत.तसेच दगड खाणी,बेकायदेशीर चालवल्या जात आहेत.
त्या पोटी भिवंडी महसूल खात्याला लाखो रूपयाचे हप्ते दिले जात आहेत.या अनधिकृत अतिक्रमण कारवार्इकडे जिल्हाधिकारी,कोकण महसूल आयुक्त यांचेही दुर्लक्ष झाले आहे या सर्व दगड,खाणी,बांधकामे,अतिक्रमणे याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे,सदर जमीनी शासनाने ताब्यात घ्याव्यात तसेच ग्रामपंचायतींना गावठण म्हणून दिलेले क्षेत्र तात्कालीन सरपंचानी विक्री केली आहे.त्या जमीनी महसूल विभागाने शासन जमा कराव्यात अन्यथा जनआंदोलन उभारू येथील नागरिकांनी दिला आहे.या जमीनी हडप करण्यामध्ये राजकारणी व शासकीय अधिकारी यांचा मोठा हात आहे त्यांच्यावर कठोर कारवार्इ झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.



No comments