शहापूर येथे शोध मराठी संस्कृतीचा भव्य दिव्य सोहळा...
By,युवा महाराष्ट्र लार्इव्ह : शहापुर
माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शहापुर मधे 'गौरव महाराष्ट्राचा-शोध मराठी संस्कृतीचा,गंध स्वराज्याच्या संस्कृतीचा' दि. १३ मे २०१८ रोजी, रात्रो ठीक ०८:०० वाजता ग.वि.खाडे विद्यालयाच्या पटांगनात भव्य दिव्य स्वरुपात १०५ कलाकरांच्या उपस्थितीत होणार आहे. 'वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ(पाषाणे-वाशिंद)' यांनी आत्ता पर्यंत ठाणे-रायगड सोबत संपुर्ण महाराष्ट्र मधे 'ज्ञान दिप लाऊ जगी', 'संगीत शिवचरित्र कथा' च्या माध्यमातुन मनोरंजन आणि प्रबोधन केले आहे. याच वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाशी सलग्न असणारी शहापुर मधील 'जाणता राजा इवेंट्स' ने या सोहळ्याचे आयोजन केले असुन, 'श्री माऊली कृपा कला अकादमी' चे १०५ कलाकारांचा ऐतिहासिक प्रसंग,विनोदी प्रसंग तसेच 'राइजिंग स्टार डांस अकॅडमी' यांचा नृत्याचा अविष्कार अनुभवायला मिळणार आहे.याच अभुतपूर्व सोहळ्याचा एक प्रयोग ८ मे २०१८ रोजी रत्नागिरी येथे यशस्विरित्या पार पडला.
" आता शहापुर मधे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांची एकुण रक्कम ही गरजु गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावली जाणार असुन,तालुक्यातील -जिल्ह्यातील कलाप्रेमी आणि समाजसेवेची आवड असणाऱ्या तमाम जनतेने या सोहळ्याच्या माध्यमातुन या सत्कार्यास हातभार लावावा!" असे नम्र आवाहन सुप्रसिद्ध किर्तनकार वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ, पाषाणे चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.कैलास महाराज निचिते यांनी केले आहे.



No comments