web-banner-lshep2024

Breaking News

देवा ग्रुपचा अनोखा उपक्रम ; 800 युवकांना देणार नोकर्‍या

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह -भिवंडी :
देवा ग्रुप हे नाव आता एैकायला आले तर सर्वांचे लक्ष लागुन राहते की,आता नवा उपक्रम कोणता आणि नव्या धडाडी कामगारीची चाहुल सर्व युवकांना आनंद करते.शाखा गावातुन महाराष्ट्रात तर निर्माण केलेच परंतु घरची चुल पेटली नाही तर घर कसे चालणार असा बारकार्इने विचार करणारे देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले,सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक वेगळा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिसून आले आहे.
भिवंडी तालुक्यातील तमाम बेरोजगार युवकांना आनंदाची बातमी अशी की,देवा ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा मंगळवार दि.3.06.2018 रोजी अंबाडी येथे सकाळी 10 वाजे.ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.तरी इच्छुक युवकांनी आपला बायोडेटा 31 मे पर्यंत कल्याणAभिवंडी बायपास वालशिंद जवळील सार्इ देवा ढाबा येथे जमा करवा असे आवाहन देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांनी केले असून अधिक माहितीसाठी 9689481321,7208470101 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
हा कार्यक्रम भिवंडी तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम तालुक्यात राबविणार असल्याचेही यावेळी तानाजीभाऊ मोरे यांनी सांगितले.आज जर आपण विचार केला जे कार्य लोकप्रतिनिधींना करायचे असते ते एका सामाजिक संघटनेने आपल्या हाती घेतले आहे.अन्यायाविरूध्द लढणारी ही संघटना जरी असली तरी 800 युवकांना नव्हे तर त्यांच्या घरातील कुटूंब सस्यांचा विचार केला तर 2 हजार कुटूंब सदस्यांना ती नोकरी म्हणजे एक प्रकारचा आधारच आहे.सुजित ढोलेंचे मार्गदर्शन,तानाजीभाऊंचे कार्य यातच सांगून जाते की,तेव्हा ही देवा भार्इ सर्वांना प्रेम,आपुलकी,सन्माण,विश्‍वास संपादीत करून मदतीचा हात देऊन जनसामान्यांचे दुखः आपल्या अंगावर घ्यायचा आणि आजही त्यानी केलेल्या कार्याच्या ठसामध्ये सुजित ढोले,तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने चांगल्या मार्गाने,प्रेमाने समाजकार्य करत आहेत.
.             त्यांच्यासमवेत सदैव अविनाश फोडसे,प्रफुल पाटील,भुषण मोरे,जिग्नेश पाटील,कल्पेश जाधव,सागर भोंडिवले,मनोज देसले व अन्य देवा ग्रुपची शान समाजसेवेचे कार्य करत आहेत

No comments