web-banner-lshep2024

Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

BY : गौरव एनएस,युवा महाराष्ट्र लार्इव्ह – मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
विघ्नहर्त्याने देशासमोरील, राज्यासमोरील तसेच शेतकऱ्यासमोरील सर्व विघ्ने दूर करावीत, अशी प्रार्थना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणरायाकडे केली. 
तसेच पंतप्रधानांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेली नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गणेशभक्तांनी संकल्पित व्हावे व या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्त केले.

No comments