मुरबाड शहरातील नवीन उड्डन पुलाला जागोजागी तडे गेल्याने नागरिकात भिती ; राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जबाबदार अभियंते ‘‘नॉट रिचेबल'’
नामदेव शेलार/मुरबाड : कल्याण-मुरबाड
माळशेज हायवे वरील रस्त्याचे कामात ठेकेदाराने केलेला घपला पाहता. या रस्त्यावर
जागोजागी धोक्याची वळण कायम ठेवली आहेत.या रस्त्याच्या दोन्ही बाजूची माती खोदकाम
करताना झाडाची बुड उघडी पडली असल्याने पावसाळ्यात अशी शेकडो झाडे कोसळून वाहतुकीला
अडथळा निर्माण करून काही ठिकाणची कोसळणारी झाडामुळे जिवित हाणी सारखे अपघातास
कारणीभूत ठरणार असल्याची अशी शंका येवू लागली आहे.याच रस्त्यावरील उदालडोह सावर्णे
अशा चार नाल्यावरील जूनी व मोडकळीस आलेल्या चार पुलावर वरच्या वर सिमेन्ट थापुन त्याच धोकादायक
पुलावरून वाहतुक सुरू केली आहे. हा रस्ता डेंजरझोन मध्ये मोडत असून पावसाळा सुरू
होण्याच्या आतच व गेल्या दोन महिण्यापुर्वी वाहतुक सुरू केलेल्या या मुरबाड शहरालगत बांधलेले उड्डन पुलाच्या खालच्या भागाला
जागोजागी तडे गेल्याने हा उड्डान पुल की
मुत्यूचा उड्डान सापळा ? ठरतोय. असे वाहन चालक
प्रवाशी मध्ये चर्चा आहे,
मुरबाड शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील नव्याने उभारण्यात
आलेला उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी पुलाखालून वर पाहिल्यानंतर पुलाच्या
काँक्रीट संरचनेवर तडे गेल्याच्या रेषा दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि
संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याने नागरिक
भयभीत झाले आहेत.सदर उड्डाणपूल हा कल्याणहून माळशेज
घाटमाथ्या कडे जाण्या येण्याचा करण्साच्या प्रवासाती महत्त्वाचा वाहतूक दुवा मानला
जात असून,दिवस-रात्र हजारो वाहने या पुलावरून प्रवास करीत
असतात.विशेष म्हणजे पुलाखालील परिसरात अनेक छोटी दुकाने, हातगाड्या
तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची नियमित वर्दळ असते. त्यामुळे या
पुलाच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित होत
असलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या तळभागावर दिसणाऱ्या या रेषा नेमक्या
पुलाला प्रत्यक्ष तडे गेल्याच्या आहेत, याबाबत अधिकृत खुलासा
अद्याप करण्यात आलेला नाही. परिणामी परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून
नागरिकांमध्ये संभाव्य धोक्याची भावना वाढीस लागली आहे.मुरबाड माळशेज महामार्ग
अद्याप पूर्ण झालेला नाही अनेक अपघातात काही जणांचा बळी गेले आहेत
स्पष्टीकरणाची
मागणी - कामात काही तांत्रिक
त्रुटी राहिल्या आहेत का? पुलाची अंतिम दर्जा
तपासणी आणि संरचनात्मक परीक्षण पूर्ण झाल्यानंतरच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला
होता का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, अनेकदा काँक्रीट सुकण्याच्या प्रक्रियेत
किंवा बांधकामातील सांध्यांमुळे काही रेषा दिसू शकतात; मात्र
त्याचे स्वरूप नेमके काय आहे, हे अधिकृत तांत्रिक
तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांकडून कोणताही निष्कर्ष न काढता
प्रशासनाने तातडीने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी
होत आहे.
पुलाची
सखोल तपासणी आवश्यक - जर ही बाब केवळ वरवरची
नसून संरचनात्मक कमकुवतपणाशी संबंधित असेल, तर भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य
जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत
पुलाची सखोल तपासणी करून अहवाल जाहीर करावा,तसेच आवश्यक
असल्यास परिसरात सूचना फलक लावून नागरिकांना सतर्क करावे, अशी
मागणी आता जोर धरू लागली आहे.विशेष म्हणजे ह्या पुलाची रस्त्याची जबाबदारी
ज्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे ते
उपअभियंता कल्याण मुरबाड व नॅशनल हायवे
यांची असता ते देखील ‘‘नॉट रिचेबल'’ असल्याने या रस्त्याची जबाबदारी पारपाडली नसल्याने हा प्रकार
घडला तर नव्हे ना असे चित्र दिसून येते तर या रस्त्याचे काम करणारी कंपनी आर.आर.एम.एस.इन्फोटेक राजस्थान यांची या कामाची दहा वर्षेाची
जबाबदारी असता या कंपनीचे मॅनेजर,शासकीय अधिकारी देखील ‘‘नॉट रिचेबल'’ पाहता या वर उपाय योजना करणार कोण? विशेष
म्हणजे या पुलावर हे सिमेन्ट पिलर उचलतानाच तडे गेल्याचे प्रत्यक्षदर्शी
अधिकारीच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले या रस्त्यावरील निकृष्ट बांधकामच्या
चौकशी करण्या बाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मात्र काहीच कारवाई झालेली
नाही,



No comments