प्रियजन महिला बचतगट समितीच्या संयुक्त विद्दयमाने जागतिक महिला दिनाच्या निमीत्त महिलांना गृह उपयोगी वस्तु व साडीचे वाटप
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
जागतिक महिला दिनाच्या निमीत्त प्रियजन महिला बचतगट समितीच्या संयुक्त विद्दयमाने महिलांना गृह उपयोगी वस्तु व साडीचे वाटप करण्यात आले.प्रियजन महिला बचतगट समितीच्या अध्यक्षा तसेच मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.ज्योतीतार्इ हिंदुराव या नेहमी वेगवेगळया पध्दतीचे कार्यक्रम राबवून महिलांना उस्फुर्त कार्यक्रमात सहभागी करताना आपल्या दिसत आहेत.त्यांच्या या आगळया वेगळया उपक्रमाची सर्वत्र ठाणे जिल्हयात चर्चा होते असते.त्यांची साथ महिला वर्गांना पुढे जाण्याचे ध्येय देत प्रोत्साही करतात.मायभुमी असलेल्या मुरबाड तालुक्यातील डोंगर न्हावे येथे त्यांनी केलेले समाजकार्य,महिलांना एकत्रित करून स्वबळावर कार्यशील करण्याचे मानस त्यांच्या मनात एक ज्योत पेटवण्याचे समाजकार्य तालुक्याचे आधारस्तंभ व लाडकी आपली तार्इ सौ.ज्योतीतार्इ प्रमोद हिंदुराव यांनी पुढाकार घेत गरूडशिखर गाठताना दिसल्या आहेत.
महिलांना बचतगटच्या माध्यमातून त्यांचे कार्य आज समस्त तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात आज त्यांचे गौरव होतांना दिसते.महिलांनी आपल्या कार्यशीलतेतून समाजासाठी अमुल्य योगदान द्दयावे हाच मुळ वारसा सौ.ज्योतीतार्इ प्रमोद हिंदुराव यांचेकडून मिळाला असून त्यांच्या याच कार्याची धडपड पाहुन महिलांनी त्यांना आपल्या मोठया तार्इ असल्याचे मानले आहे.ताईंची भुमिका न्यायाची,हक्काची,ध्येय गाठण्याची,स्वबळाची असल्याने ताईंनी महिलांना आपल्या स्तरावर घेऊन एकतेने पुढे जाण्याचे मनोबल ध्येय आजही महिलांच्या मनात घर करून बसले आहेत.अशा ताईंनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यासह संपुर्ण जिल्हयात महिलांना गृह उपयोगी वस्तुचे व साडीचे वाटप केले.या कार्यक्रमाची सुरूवात मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे येथून करण्यात आली.या कार्यक्रमाला महिलावर्गांनी भरघोस असा प्रतिसाद देऊन सौ.ज्योतीतार्इ प्रमोद हिंदुराव यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले आहे.या कार्यक्रमाला तालुक्यातील व जिल्हयातील विविध असे मान्यवर,पदाधिकारी,बचतगटवर्ग,महिलावर्ग,नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली होती.




No comments