गोरगरिबांना न्याय देणारे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे सेवानिवृत्त
नामदेव शेलार / ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहापूर सह आदिवासी भागामधील प्रत्येक गोरगरीब धारकांना तात्काळ न्याय देणारे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (Collector Ashok Shingare) आपल्या सेवेतून निवृत्त झाले आहेत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या सेवानिवृत्त समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वन मंत्री गणेश नाईक शंभूराज देसाई प्रताप सरनाईक यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
31 जुलै 2025 रोजी दुपारी तीन वाजता डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह खेवरा सर्कल ठाणे पश्चिम येथे कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे सेवानिवृत्तीच्या 60 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक अधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडवून जातो अनेक खडतर समस्या संकटांना तोंड द्यावे लागते मात्र त्यांच्या सहवासात अनेक लोकांचे संगोपन होते मैत्री होते असेच ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी गोरगरिबांना न्याय दिला प्रशासनात उत्तम कर्तबगार कामगिरी केली विविध प्रकल्पांना चालना दिली.
जातपात धर्म पक्षाचे लोकांना माणूस म्हणून पाहिले त्या ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा प्रशासकीय प्रवाहाचा निरोप समारंभ होतांना प्रत्येकाच्या भावना अश्रूच्या नयनाने प्रलावीत झाले आहेत राज्यात विविध ठिकाणी प्रशासनाचे कामकाज इमाने इतबारे सांभाळले अशा कर्तव्यदक्ष अधिकारी अशोक शिनगारे यांना जीवन प्रवाहात अथांग आयुष्य लाभो ही शुभेच्छा ठाणे जिल्ह्यात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आले आणि गेले प्रत्येकांनी आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवला हाच सहवास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यात लाभला त्यांचे मार्गदर्शन निवृत्तीनंतर सदैव लाभो ही अपेक्षा



No comments